मंत्र्याने मतासाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवले डोके !

Arun Yadav

ग्वालियर :- मध्य प्रदेशात विधानसभेसाठी पोटनिवडणूक होते आहे. निवडणूक प्रचार जोरदार सुरू आहे. ग्वालिअर येथे मत मागताना मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर (Pradyumna Singh Tomar) एका काँग्रेस  कार्यकर्त्याच्या पायावर डोके ठेवतानाचा  व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, तोमर हे आधी काँग्रेसमध्ये होते आणि जोतिरादित्य शिंदे यांच्यासोबत पक्षांतर करून भाजपात आले आहेत. मंत्री आहेत. जोतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काही आमदारही पक्षांतर करून भाजपात आले व त्यातले काही मंत्री झाले आहेत. तोमर त्यातील एक आहेत.

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते अरुण यादव (Arun Yadav) यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. पोस्टमध्ये ते म्हणतात, पाहा कसे एका लाचार मंत्र्याने काँग्रेसच्या टिकाऊ कार्यकर्त्यासमोर गुडघे टेकले. काँग्रेसचे काही नेते बिकाऊ असू शकतात, मात्र काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता टिकाऊ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER