कोरोनाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं निधन

Suresh Angadi

नवी दिल्ली :- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (Suresh Angadi) यांचे आज निधन झालं आहे. बुधवारी वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंगडी यांच्यावर गेले २ आठवड्यांपासून उपचार सुरू होते. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते. ११ सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्विट करून आपल्यालाकोरोनाची बाधा झाला असल्याची माहिती दिली होती.त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्या, असं आवाहनही केलं होतं. सुरेश अंगडी २००४ पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांची कोरोना (Corona) चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER