गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा कर्नाटक सरकारला इशारा

Satej Patil warns Karnataka government

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाचे (Corona Virus) रुग्ण वाढत असल्याने कर्नाटक सरकारने (Karnataka government) कोगनोळी येथे विशेष वैद्यकीय नाका उभारुन प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणी नसेल तर प्रवेश नाकारला जात आहे. अशाच पद्धतीने कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी, त्याच राज्य सरकारने घ्यायला हवी. अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवर ही बंदी घालू असा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज कर्नाटक सरकारला दिला.

कर्नाटक सरकारच्या अशा वागण्याने दोन्ही राज्यातील संबंधावर परिणाम होत असून केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत, याबाबत मुख्य सचिवांशी तसेच कर्नाटक सरकारशीही चर्चा केली करणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

पुणे-बंगळूर महामार्गावर कोगनोळी टोल नाका येथे कर्नाटक सरकारने तपासणी नाका उभारला आहे. आरटीपीसीआर तपासणी झाली, असेल तरच महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना प्रवेश दिला.

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे.यामुळे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पाटील यांनी सांगितले.

देश आणि जगभरातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणीची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तपासणी करून त्यांना गरज वाटल्यास क्वॉरंटाईन करण्याची जबाबदारी ही मुंबई महापालिकेने घेतली आहे. यामुळे कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी घ्यावी, अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER