राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Minister of State Bachchu Kadu contracted corona for the second time

अमरावती : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनादेखील कोरोनाची लागण होताना दिसत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे संपर्कातील व्यक्तींना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

“माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.” असे बच्चू कडू ट्विट करत म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. यवतमाळ, अकोला आणि अमरावती हे हॉटस्पॉट बनू लागले आहेत. राज्य सरकारकडून वेळोवेळी याबाबत नागरिकांना अलर्ट करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER