भविष्यकालीन कृषी धोरणांवर नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई :- भविष्यकालीन कृषी धोरणांवर कृषिमंत्री दादाजी भुसे यांची नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र आणि नेदरलँड्स यांच्यामधील संबंध अधिक दृढ करण्याबद्दल आणि कृषी, आरोग्य, कौशल्य, इंधन, पाणी, स्त्री पुरूष समानता, जीवन विज्ञान या विषयांवर चर्चा करण्यात आली. कमीत कमी पाण्याचा वापर करून कापसाचे उत्पन्न कसे वाढविता येईल, यावर आधारित नवीन प्रकल्पाबद्दल यावेळी चर्चा झाली. या बैठकीला कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले तसेच विभागातील अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊन विद्यापीठाचा निर्णय : उदय सामंत