केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोरोनावर मात

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी कोरोनावर (Corona Virus) मात केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती. स्वत: नितीन गडकरी यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली आहे.

 “तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी कोरोनामधून पूर्णपणे बरा झालो आहे.” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी गडकरी यांनी ट्विट करत कोरोनाबाधित झाल्याची माहिती दिली होती.

“कालपासून काहीसा अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. यानंतर आपण डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्यानंतर कोरोना चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे सध्या माझी प्रकृती चांगली आहे. मी स्वतःला आयसोलेट केलं आहे.” असं ट्विट त्यांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER