नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा खटला; मंत्री सुनील केदार अडचणीत

Sunil Kedar

नागपूर :- काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) नागपूर (Nagpur) जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणाच्या खटल्यामुळे अडचणीत आले आहेत. या खटल्यात काय प्रगती झाली याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मागितली आहे.

हा घोटाळा २००२ चा असून १५२ कोटी रुपयांचा आहे. सुनील केदार बँकेचे अध्यक्ष असताना बँकेने मे. होम ट्रेडला सरकारी रोख्यांमध्ये गुंतवण्यासाठी १५२ कोटी रुपये दिले होते. ही रक्कम नंतर मे. होम ट्रेडर्सकडून बँकेला परत मिळाली नाही. चौकशीनंतर या प्रकरणी आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले. एसीजेएम एसआर तोतला यांनी १९ सप्टेंबरला साक्षीदारांच्या साक्षी नोंदवायला सुरुवात केली आहे. २४ सप्टेंबरला उलटतपासणी घेण्यात येणार आहे. या खटल्याला १७ वर्षे उशीर झाल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती एन.बी. सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने मूळ याचिकाकर्ते ओमप्रकाश कामडी आणि इतरांच्या मागणीवरून कोरोनामुळे रेंगाळलेली ही सुनावणी पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला. याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) एस. आर. तोतला यांच्या न्यायालयात होणार आहे. याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर म्हणाले की, न्यायालयाकडे हे एकच प्रकरण असल्याने सुनावणी लवकर होऊ शकेल.

या प्रकरणात नोव्हेंबर २०१९ ला गैरव्यवहार, फसवणूक, फौजदारी गुन्ह्याचा कट हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यात वर्तमान मंत्री सुनिल केदार आणि इतर आठ आरोपी आहेत. आरोपींविरुद्ध कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१, १२० (बी) आणि आयपीसी ३४ लावण्यात आले आहे.

या खटल्यात सुनील केदार यांच्याशिवाय शेअर दलाल केतन सेठ (मुंबई) आणि बँकेचे माजी महाव्यवस्थापक के. डी. चौधरी हे देखील आरोपी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER