… तरीही धीरोदात्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय ; आव्हाडांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सलाम

Jitendra Awhad - Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या संबोधनावर तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वार विरोधी पक्षाकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्याच भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, अशा शब्दात आव्हाड यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.

“पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत.. त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!”, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : बघा तुमचं वजन वापरून काही मिळतं का?; मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button