मंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Jayant Patil

सांगली : मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे शेतकरी आंदोलनातील (Farmers Protest) हिंसेचे समर्थन करत आहेत. जनतेमध्ये भडक वक्तव्ये करून द्वेष निर्माण करत आहेत. ते मंत्री आहेत आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकसुद्धा हिंसेचे समर्थन करू शकत नाहीत, याचे भान त्यांनी ठेवावे, असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ना. पाटील यांना सल्ला दिला. ना. पाटील यांच्या परिसंवाद यात्रेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी आ. पाटील म्हणाले, शेतकरी आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याबाबत उगीच काही मनाच्या बाता तयार करू नयेत. सगळ्या जगाने हे पाहिले आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली हिंसेवर विश्वास असलेले लोक मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे प्रचंड हिंसाचार झाला आहे. त्यांनी केलेला हिंसाचार लपविण्यासाठी त्यांच्याकडून नवनवीन स्टोरी तयार केल्या जात आहेत. जगाने हे प्रसार माध्यमांद्वारे हे पाहिले आहे. भाजप सरकारवर आरोप करून लोकांना भडकवले जात आहे. केंद्र सरकारने नऊ वेळा शेतकरी संघटनांशी चर्चा केली.

चर्चेतून खूप गोष्टी मान्य झाल्या होत्या. केंद्र सरकार या कायद्याची अंमलबजावणी थांबवेल असे सांगितले होते. त्यासाठी शेतकरी नेत्यांना आवाहन केले होते की, समिती नेमून चर्चेतून मार्ग काढू; यापेक्षा जास्त आणखी काय करायला हवे होते? हिंसेचे समर्थन न करता आंदोलने झाली पाहिजेत.

ते म्हणाले, कोरोनाच्या (Corona) काळात भीतीमुळे स्वत:ला घरात बंदिस्त करून घेतलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता प्रासंगिक बाहेर दिसू लागले आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसी यासह राज्यात बरेच महत्त्वाचे प्रश्न आहेत. परंतू राज्यातील मंत्र्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. कोरोनाच्या काळात शेतकरी, कामगार किंवा ज्यांना आवश्यकता आहे, अशांना कोणतीही मदत मिळाली नाही. जोपर्यंत कामगार, शेतकरी, शिक्षक जोवर रस्त्यावर उतरत नाहीत, तोवर सरकारला जाग येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER