मंत्री जयंत पाटील यांचा काँग्रेसला दे धक्का

Jayant Patil

सांगली : सांगली (Sangli) कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील व सुमारे आठ ते दहा संचालक आज ( रविवार) दुपारी १ वाजता राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला.

सांगली बाजार समितीत काँग्रेस (Congress) नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) व आमदार विक्रम सावंत (Vikram Sawant) यांच्या यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. बाजार समितीतील संचालक हे डॉ. कदम गट, मदनभाऊ गट, विशाल पाटील गट, अजितराव घोरपडे गट, संजय काका गट, अशा विविध गटांचे आहेत. सभापती दिनकर पाटील हे मदन भाऊ गटाचे आहेत. बाजार समितीच्या संचालक मंडळाची पाच वर्षाची मुदत संपलेली आहे. अन्य काही बाजार समितीमध्ये संचालक मंडळाला मुदतवाढ दिली असताना सांगली बाजार समितीवर मात्र प्रशासक नियुक्ती करण्यात आली होती. संचालक मंडळाने त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने प्रशासक नियुक्तीला स्थगिती देत शासनाला सहा आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. ही मुदत संपण्यास अजून तीन आठवडे बाकी आहेत. दरम्यान, मंत्री जयंत पाटील यांनी बाजार समिती च्या निमित्ताने काँग्रेसच्या एका गटाला धक्का दिल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER