मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

Jayant Patil

सांगली : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ही माहिती स्वतः ट्विट करत दिली आहे. कोरोना जातोय, असे वाटत असतानाच हा महामारीचा विषाणू महाराष्ट्रात नव्या परतल्याची चिन्हे दिसत आहेत. दिड महिन्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण नोंदवले गेले.

आपल्या ट्वीट मध्ये ना. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्चुअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद!”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER