मुंबईकरांना लवकरच ‘आरे’मध्ये  पर्यावरणपूरक पर्यटनाचा आनंद घेता येणार : आदित्य ठाकरे 

  पर्यावरण रक्षण आणि पर्यटनाच्या विकासासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांचा आरे दौरा

Aaditya Thackeray

मुंबई : मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलातील  ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली. त्यानंतर आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आरे जंगलाला भेट दिली. आज पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. जागेतील युनिट ४, २१ व २२ ला त्यांनी भेट दिली.

आदित्य ठाकरे यांच्या आरे दौ-यात यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, दुग्धविकास आयुक्त भांगे उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले,  मुंबईकर आणि पर्यटकांना याठिकाणी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा आनंद घेता येणार.

तसेच, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील व इतर अधिकारी यांच्या समवेत मालाड (वेस्ट) मधील एरंगळ येथील एमटीडीसीच्या जागेची पाहणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER