मंत्रिपदाचा राजीनामा देणे अपेक्षित! परंतु राठोड यांनी राजीनामा दिला नाही : प्रविण दरेकर

Pravin Darekar

मुंबई : “वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाण (Pooja Chauhan) यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. मात्र, पूजाचा मृत्यू कसा झाला? यावर त्यांनी अद्यापही भाष्य केले नाही. नैतिक जबाबदारी स्वीकारून संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही. उलट त्यांनी समाजमाध्यमांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.” अशी टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. तब्बल १६ दिवस अज्ञातवासात असलेले वनंमत्री संजय राठाेड आज जनतेसमोर आले. त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले. अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली.

प्रविण दरेकर म्हणाले की, “संजय राठोड यांनी फक्त मीडियासमोर येण्याचे नाटक केले आहे. समाजाचा दबाव निर्माण करून त्यांनी प्रसारमाध्यमांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला. पण सत्ताच आपल्याला यातून सोडवू शकतो, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला नाही.”

मुख्यमंत्री बळी पडतायत का?

प्रविण देरकर यांनी मुख्यमंत्र्यांवरसुद्धा टीका केली. “राज्यातील महिला, याविषयी मुलींच्या मनात काय यातना होत असतील, याची जाणीव सरकारला व्हावी. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांचे उत्तर द्यावे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहेत का? असा प्रश्न आता पडू लागला आहे.” असे दरेकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER