दाऊदच्या सात पिढ्या खाली आल्या तरी ‘मातोश्री’चे वाकडे करु शकणार नाही ; शिवसेनेच्या नेत्याची गर्जना

Dawood Ibrahim - Eknath Shinde

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) हस्तकाने दिल्याची माहिती आहे. यावरून शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

‘मातोश्री’चे कोणी वाकडं करु शकत नाही. ‘मातोश्री’ हे मराठी माणसाचे सन्मानाचे स्थान आहे. दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मतोश्रीचे वाकडं करु शकणार नाहीत. पाकिस्तान देखील मतोश्रीचे वाकडे करु शकत नाही. दाऊद हा दुसऱ्याच आश्रय घेऊन राहतो. पोकळ धमक्यांना शिवसेना घाबरत नाही,असे शिंदे म्हणाले .

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री (Matoshree) या खासगी निवासस्थानी काल सकाळी ११ वाजताच्या सुमरास धमकीचा कॉल आला. काही वेळेच्या अंतराने मातोश्रीच्या लँडलाइन फोनवर तीन ते चार कॉल आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या व्यक्तीने कॉल केला होता ती व्यक्ती आपण दुबईतून बोलत आहे. मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे. मी दाऊद इब्राहिमचा माणूस आहे, असा दावा करत होती. उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची तसेच मातोश्री निवासस्थान बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकीही या व्यक्तीने दिल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले.

ही बातमी पण वाचा : “मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली महिला कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते, हे…” शिवसेनेची टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER