मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, शिंदे यांच्या अंगठ्याला थोडी दुखापत

Eknath Shinde Car Accident

ठाणे : नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे. गुरुवारी 24 डिसेंबर रोजी वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात हा अपघात झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अंगठ्याला थोडीफार दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे.

एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा केला जात असल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. शिंदेंच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना तसंच धूप, अगरबत्ती, गुलालही व्हिडीओत पाहायला मिळाले होते. आतापर्यंत दोघांना अटकही करण्यात आली आहे. पण हे एखादं मोठं षडयंत्र आहे का याचा तपासही आता पोलीस करत आहेत.

विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांचा जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर केला जात असल्याचा दावा केला जात होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER