शिक्षणाची जिद्द, मंत्रिपद सांभाळत एकनाथ शिंदे `डिस्टिंक्शन`ने बी.ए. पास!

Eknath Shinde

ठाणे :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात ठाण्यातील ज्ञानपीठ विद्यालयाचा निकाल यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा १०० टक्के लागला आहे. विशेष म्हणजे येथून यंदा पदवीधर झालेल्यांच्या यादीत राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव आहे. कला शाखेतून एकनाथ शिंदे ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तर सुमन काकडे यांना ७७.७५ टक्के गुण मिळाले आहेत.

ज्ञानपीठ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ठाण्यातील केंद्र असून दरवर्षी या केंद्राचा निकाल १०० टक्के लागतो. याही वर्षी निकाल १०० टक्के लागला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आमच्या विद्यालयाची निवड केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांनी अंतिम वर्षासाठी मराठी आणि राजकारण या दोन विषयांची निवड केली होती, अशी माहिती विद्यालयाच्या केंद्र संयोजक तथा प्राचार्या प्रीती जाधव यांनी दिली.

मला ऐन उमेदीच्या काळात काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते; परंतु संधी मिळताच शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ होती. त्यामुळे संधी मिळताच सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेऊन शिक्षणाचा पुनश्च श्रीगणेशा केला होता. गेली तीन वर्षे नियमित परीक्षा देऊन आता बी.ए. पदवीधर झालो याचे समाधान आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : बदलापुर येथे २२ एकर जागेत बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक; आठ महिन्यांत पूर्ण होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER