मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना ; राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

नाशिक :- राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची (Corona Virus) लागण झाली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विट करुन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून आणखी 24 तासही उलटत नाहीयत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन भुजबळ यांनी केली. तसंच माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : राज्यात आताच कोरोना कसा वाढला? मनसेने व्यक्त केली शंका …

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER