उद्धव ठाकरेंचा स्वभाव लय भारी; अशोक चव्हाणांकडून कौतुकाचा वर्षाव

CM Uddhav Thackeray - Ashok Chavan

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा स्वभाव खूप सकारात्मक आहे, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे . शिवसेना खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्यासमोर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली.

दिवाळीच्या (Diwali) पूर्वसंध्येला नांदेडमध्ये दैनिक सत्यप्रभा या दैनिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रात्री पार पडले. यावेळी अशोक चव्हाण बोलत होते .

राज्यात तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात आल्याने कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यातून अनेकदा जाहीर कार्यक्रमांतून जुन्या कटू आठवणींना आता उजाळा देण्यात येत आहे .

स्वप्नात देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल, असं कुणाला वाटलं नव्हतं. आम्ही तर कधी असा विचार देखील केला नव्हता. मात्र वर्षाभरापूर्वी पवारसाहेब, सोनियाजी आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. राज्याला विकासकामांच्या बाबतीत सकारात्मक मुख्यमंत्री लाभला आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव खूप सकारात्मक आहे, असे चव्हाण म्हणाले.

सत्यप्रभा या दैनिकाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी हेमंत पाटील यांनीही टोलेबाजी केली. आठ दिवस ज्या वर्तमानपत्रामुळे मी तुरुंगात राहिलो त्याच वर्तमानपत्राच्या दिवाळी अंकाचे माझ्या हस्ते उद्घाटन होते , यापेक्षा अधिक भाग्याची कोणती गोष्ट असते, असे खा. पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER