वारिस पठाणची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून मनसेने मारले जोडे

मुंबई : वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ एमआयएमचे वारिस पठाण यांची मनसेतर्फे रविवारी जालन्यात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘जोडे मारो’ आंदोलन केले. वारिस पठाण यांनी एका जाहीर सभेत बोलताना ‘आम्ही १५ कोटी १०० कोटींवर भारी आहोत’ असे विधान केले होते.

माझ्यावर Phd करायला चंद्रकांत पाटलांना दहा वर्ष लागतील : शरद पवार

या विधानावरून वारिस पठाण यांचा सर्व स्तरांतून निषेध होत असून जालना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरातील स्वातंत्र्य सैनिक रामभाऊ राऊत चौकात त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून तोंडाला काळे फासून अंत्ययात्रा काढण्यात आली. वारिस पठाण यांनी माफी नाही मागितली तर त्यांच्या तोंडाला मनसेतर्फे काळे फासण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत ‘देश के गद्दारो को, गोली मारो सालो को’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

दरम्यान वारिस पठाण यांनी एका जाहीर सभेत बोलताना ‘आम्ही १५ कोटी १०० कोटींना भारी आहोत’ असे विधान केले होते. १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका सभेत पठाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. पठाण यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं, त्यावेळी एमआयएमचे असदुद्दीन ओवीसी हेदेखील उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.