पंकजा मुंडे यांचं उपोषण म्हणजे नौंटकी : इम्तियाज जलील

Imtiaz Jalil-Pankaja Munde

मुंबई : मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं एकदिवसीय उपोषण सुरू आहे. मुंडे यांच्या उपोषणावर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. पंकजा मुंडे यांच्या उपोषणावर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जलील यांनी टीकास्त्र सोडले आहे.

‘पंकजा मुंडे यांचं उपोषण म्हणजे नौंटकी आहे. सरकार गेल्यामुळे त्यांची ही नौंटकी सुरू आहे. ज्यावेळी भाजपाचं राज्यात आणि केंद्रात सरकार होतं, त्यावेळी त्यांनी काय केलं. हे पुढारी नागरिकांना मूर्खात काढत आहेत.’

पुढे बोलताना जलील म्हणाले की, ‘पाच वर्ष तुमचीच सत्ता होती आणि तुम्ही मंत्री होता. त्यावेळी तुम्ही काय केलं. लोक तुमच्या नौंटकीला ओळखलील.’ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार देखील नाटक असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे .

कोणावर टीका करण्यासाठी नाहीतर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण – पंकजा मुंडे