मोदींनी पाळलेला साप त्यांनाच डसणार – असदुद्दीन ओवेसी

Asaduddin Owaisi - PM Narendra Modi

हैदराबाद :- (सीएए) सुधारित नागरिकत्व कायद्यावरून ईशान्य दिल्लीत हिंसाचाराने आक्रमक रूप धारण केले आहे. या हिंसाचारात सात जणांचा बळी गेला आहे. एका पोलिसासह सहा जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. यावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्रम्प दौ-यावर असताना दिल्लीत दंगल; हे गृहमंत्र्यांचे अपयश, शाहांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो साप पाळला आहे, तो त्यांना डसेल हे आम्ही त्यांना सांगू इच्छितो.” असे ओवेसी म्हणाले. “दिल्लीतील ह्या हिंसाचारात एका माजी आमदाराचा हात आहे. आता यामध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचेही पुरावे समोर आले आहेत. त्या माजी आमदारांना त्वरित अटक केली पाहिजे आणि लवकरात लवकर हिंसाचार थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असं न झाल्यास या हिंसाचाराची व्याप्ती वाढेल. ” असंही ओवेसी म्हणाले.

तसेच, गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसंच त्यांनी हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांवरही दबाव टाकावा, अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे. परदेशी पाहुणे भारतात आलेले असताना अशा प्रकारचा हिंसचार उफाळणे ही देशासाठी लाजिरवाणी बाब आहे. या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करतो, असे ओवेसी म्हणाले.