पेट्रोलच्या दरवाडीबाबत शांत! दूध १ मार्चपासून १०० रुपये लिटरने विकू; शेतकऱ्यांचा इशारा

Milk Price Incease

नवी दिल्ली : पेट्रोलने शंभरी पार केली तरी या देशातील नागरिक शांत आहेत. डिझेलचे भाव वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक केली असा आरोप करून १ मार्चपासून ५० रुपये लिटरचे दूध १०० रुपये दराने विकू, अशी घोषणा यांनी विकू, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला दिला.

सिंघू सीमेवर आंदोलन करीत असलेले भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) जिल्हा प्रमुख मलकीत सिंह म्हणालेत, नागरिकांना १०० रुपये पेट्रोलचे ओझे होत नाही तर याच दराने आम्ही १ मार्चपासून दूध विकणार आहोत. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी दुधाचे भाव दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER