दूध दरवाढ : सोलापुरात जनावरांसह शेट्टी काढणार 17 ऑगस्टला मोर्चा

Raju Shetty

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी गायीच्या दूध खरेदीला पाच रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, दूध भुकटीसाठी ५० रुपयांचे प्रतिकिलो अनुदान द्या यामागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाची घोषणा सोशल मिडीयाच्या माध्यमातून करताना शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी जनावरांसह सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

राज्य आणि केंद्र सरकार दूध प्रश्नावर उदासिन आहे. मागील महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महिन्यात राज्यभर दूध बंद आंदोलन केले होते. सरकारने याकडे लक्ष दिले नाही. दूध दरप्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारला पत्रव्यवहार केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दुग्धविकासमंत्री सुनील केदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांना सुद्धा पत्र लिहिले. खा. शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला. पण दुर्दैवाने अद्याप याबाबत काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे नाईलाजाने यापुढे आंदोलन तीव्र करावे लागेल असा इशार यानिमित्ताने शेट्टी यांनी दिला. आता तातडीने राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच रुपये दराने एकूण रक्कम जमा करण्याची आवश्यकता असून याबाबत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER