
मुंबई : काँग्रेसचे (Congress) मुंबई अध्यक्ष लवकरच बदलले जाणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आता जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची चर्चा सुरु आहे. त्यात आता मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुंबई अध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.
मिलिंद देवरा यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल, पवनकुमार बन्सल यांची भेटही देवरा यांनी घेतली. त्याचबरोबर देवरा हे राहुल गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिलिंद देवरा यांनी भाई जगताप, चरणसिंह सप्रा आणि सुरेश शेट्टी यांना मागे टाकत अध्यक्षपदासाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरु केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
मिलिंद देवरा यांच्या भेटीनंतर मुंबई अध्यक्ष निवडीवर काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरु झाली असून, काँग्रेस संघटनचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे. मुंबई अध्यक्ष निवडीवर आज अंतिम चर्चा करुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीकडे अहवाल सादर करणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला