‘राऊतांकडून सौम्य समज, मात्र शिवसेनेच्या रणरागिणी कंगनाचे थोबाड फोडतील’

Ranaragini will break Kangana mouth

मुंबई : मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राऊतांनी केलेल्या मागणीनंतर कंगनानेही आपण ९ तारखेला मुंबईत येणार असल्याची माहिती दिली आहे. ‘९ तारखेला मुंबईत येते, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा’ असे ट्विट तिने केले आहे.

यावरून आता शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत कंगनाला लक्ष्य केले आहे. ‘कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या शिवसेनेच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे ट्विट प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

दरम्यान, आज परत एकदा संजय राऊत यांनी कंगना रनौतवर हल्लाबोल केला. मी पोकळ धमक्या देत नाही, मी हाडाचा शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का? त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER