पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake

सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरातील (Mild tremors in western Maharashtra)काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी(Earthquake of Magnitude:3.3) नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे.

भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने कोणतीही हानी किंवा धोका निर्माण झाला नाही. यामध्ये अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झालेली नसल्याची माहिती पाटण महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, गेल्या २ महिन्यामध्ये कोयना धरण परिसरात बसलेला भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्यामुळे स्थानिकांमध्ये भिती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button