माईक टायसनची पुनरागमनाची लढत बरोबरीत

Mike tyson

आपल्या काळातील यशस्वी बॉक्सर (Boxer) माईक टायसन (Mike Tyson) याने तब्बल 15 वर्षानंतर वयाच्या 54 व्या वर्षी बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पदार्पण केले आहे आणि त्याची पुनरागमनाची राॕय जोन्स ज्युनियर (Roy Jones Jr) विरुध्दची लढत बरोबरीत सुटली आहे.

कोरोनामुळे प्रेक्षकांशिवायच ही लढत लाॕस एंजेल्स (Los Angeles) येथील स्टेपल्स सेंटरवर पे पर व्ह्यु या प्रक्षेपण पध्दतीने झाली. या लढतीबद्दल प्रचंड उत्सुकता होती.

आठ फेऱ्यांच्या या लढतीत माईक टायसनचा प्रतिस्पर्धि हा 51 वर्षीय माजी हेविवेट विजेता रॉय जोन्स होता. टायसन 2005 मध्ये निवृत्त झाला होता. शेवटच्या लढतीत तो केव्हिन मॕकब्राईडकडून पराभूत झाला होता.

कॕलिफोर्निया स्टेट अॕथलेटीक कमिशनच्या 50 वर्षावरील बॉक्सर्ससाठीच्या नियमानुसार नेहमीप्रमाणे तीन मिनिटांच्या फेऱ्या न होता प्रत्येकी दोन मिनीटांच्या झाल्या आणि दोन्हीही स्पर्धकांना नाॕकआऊट नको असल्याने या लढतीत कुणालाच विजयी घोषित करण्यात आले नाही.

टायसन म्हणाला की फेऱ्या दोन दोनच मिनिटांच्या झाल्या असल्या तरी काही वेळा त्या तीन मिनीटांच्या असल्यासारखे वाटले. मला आनंद आहे की मी पुनरागमन चांगले केले आणि आणखी लढती खेळायची मला आशा आहे. लढतीचा निकाल बरोबरीत राहिला असला तरी टायसन लढताना वरचढ दिसला. तर जोन्स हा थकलेला वाटत होता आणि लढतीत बराच वेळ तो टायसनला धरुन धरुनच खेळला. तो मात्र लढत बरोबरीत असल्याच्या निर्णयावर नाराज दिसला.

टायसनने आपल्या कारकिर्दीत 50 विजयांपैकी 44 नाॕक आऊट नोंदवले आहेत त्याने पुनरागमनासाठी तब्बल 100 पौंड वजन घटवले आणि कसून सराव केला होता. जोन्सच्या कारकिर्दीत 66 विजय, त्यात 47 नॉकआऊट आणि 9 पराभव आहेत. त्याची फेब्रुवारी 2018 नंतरची ही पहिलीच लढत होती.

दुसऱ्या फेरीत टायसनने डावीकडून जोन्सच्या डोक्यावर लगावलेल्या एका जोरदार ठोश्याने जोन्स गांगरलेला दिसला. त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या फेरीत तो टायसनला पकडून पकडूनच खेळताना दिसला. पाचव्या फेरीतही टायसनने जोरदारा ठोसे लगावल्याचे दिसले.

लढत पूर्ण आठ फेऱ्यापर्यंत गेल्याचा मला आनंद आहे, 15 वर्षानंतर पहिल्यांदाच खेळत असल्याने मला पूर्णवेळ खेळू शकेल का अशी भीती होती असे टायसनने म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER