टायसनशी लढणार टायसन!

Mike Tyson to fight Tyson Fury

माईक टायसन पुनरागमनाच्या वाटेवर असताना त्याच्याशी लढण्यास कितीतरी जण तयार आहेत. याच संदर्भात ताजी बातमी आली आहे की आताच्या पिढीतील यशस्वी बॉक्सर टायसन फ्युरी याने माईक टायसनशी लढायची तयारी चालवली आहे. यासंदर्भात आपल्याला ऑफर आली असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. मला यासंदर्भात फोन आला होता. त्यावर मला विचारण्यात आले की, माईक टायसनशी प्रदर्शनी लढायला तुला आवडेल का? यावर मी लगेच प्रतिसाद दिला की हो…का नाही? ही बातमी आली असली तरी त्याला अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही.

याप्रकारे हेवीवेट गटाचा माजी विश्वविजेता आणि विद्यमान विश्वविजेता अशी लढत होण्याची शक्यता आहे. बॉक्सिगच्या चाहत्यांसाठी ही स्वप्नवत लढत आहे. योगायोगाने फ्युरीचे नाव माईक टायसनच्याच नावावरून ठेवण्यात आले आहे. स्वतः माईक टायसननेसुध्दा ब्रिटनचा फ्युरी हा आपला आवडता बाॕक्सर असल्याचे म्हटले आहे.

टायसन फ्युरीची याआधीच डिओन्ते वाईल्डरशी लढत नियोजित आहे आणि अँथनी जोशुआ सोबतही त्याची लढत होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे एकेकाळचा माईक टायसनचा प्रतिस्पर्धी इव्हँडर हाॕलिफिल्ड यानेसुध्दा 57 वर्षे वयात पुनरागमनाची तयारी चालवली आहे. टायसनपाठोपाठ त्यानेसुध्दा आपल्या जोरदार सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रत्यक्षात झाली तर या दोघांतील ही तिसरी लढत असेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER