लांजा कृषी विद्यालयाच्या क्वारंटाईन सेंटरवर चाकरमान्यांचा धुडगूस

Migrant workers

रत्नागिरी : मुंबई, पुणे व अन्य ठिकाणांहून लांजा तालुक्यात येणार्‍या प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीसाठी निश्चित केलेल्या देवधे येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर चाकरमान्यांचा धुडगूस सुरू आहे. हे लोक केंद्राच्या आवारात मुक्त संचार करत असून कोठेही नैसर्गिक विधी उरकले जात असल्याने येथील अधिकारी व कर्मचारी हैराण झाले आहेत.

कृषी तंत्र विद्यालय लांजाचे अधीक्षक यांनी डाॅ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांना याविषयी निवेदन दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे व अन्य ठिकाणांहून येणार्‍या प्रवाशांच्या तपासणीसाठी लांजा देवधे येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या कार्यालयातील अध्ययन कक्ष प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. सध्या येथील अधिकारी आणि कर्मचारी या लोकांमुळे हैराण झाले आहेत.

या चाकरमान्यांनी रोपवाटिकेतील रोपांचे आणि कलमांचे नुकसान केले आहे. हे चाकरमानी मुंबई, पुणे आणि ईतर रेडझोन भागातून येत असले तरीही कार्यालयाच्या सर्व भागात संचार करत आहेत. रात्रीच्या वेळी हे लोक कोठेही बाह्यविधी, ऊलटी यासारखे प्रकार करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER