कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन आवश्यक : रणदीप गुलेरिया

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात सातत्याने कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. सरकारसमोर पुन्हा एकदा मोठे संकट येऊन उभे आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊनची (Micro Lockdown) आवश्यकता आहे, असे मत एम्सचे (AIIMS) प्रमुख आणि कोविड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria)यांनी व्यक्त केले आहे. देशात कोरोनाबाधितांची वाढत्या संख्येला आळा घालणे आणि सुरक्षेच्या सूचनांचे पालन करण्यासाठी नव्या रणनितीची आवश्यकता आहे. जेणेकरून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर नियंत्रण मिळवता येईल, असा सल्ला गुलेरिया यांनी रविवारी दिला.

“देशात कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याची शक्यता आहे. तसेच यावर नियंत्रण मिळवले जात नाही, तोपर्यंत आरोग्य व्यवस्थेवर ताण कायम राहिल. यासाठी मायक्रो लॉकडाऊन हाच पर्याय आहे, जो कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यापासून मदत करू शकतो. जलदगतीने रोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी करावी लागेल. यामध्ये कन्टेन्मेंट झोन, लॉकडाऊन एरिया, चाचण्यांची संख्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन अशा पर्यायांचा वापर केला पाहिजे.” असे गुलेरिया म्हणाले.

अर्थव्यवस्थेला फटका न बसणारी पावले उचलावी

“आपण अशी पावले उचलू शकतो, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार नाही. यामध्ये अनावश्यक प्रवासाला टाळले पाहीजे. तसेच लोकांनी निश्चितच्या सुट्टीच्या कालावधीत बाहेर जाणे टाळले पाहीजे. यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गावर अंकुश लावण्यास मदत मिळेल. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त नसेल अशा ठिकाणीही लक्ष देण्यास मदत मिळेल. हा एक मोठा बदल आहे, केवळ हवाई प्रवासाबद्दलच बोलत नाही, तर रस्ते आणि गाड्यांच्या हालचालींबद्दलही बोलत आहोत. परंतु आपण त्यास संपूर्णतेकडे पहाल, तेव्हा आपल्याला हे समजेल, की ते किती अवघड आहे. जीनोम सिक्वेंन्सिंग आणि त्याच्या महासाथीच्या डेटाच्या जोडणीसाठी हे महत्वाचे आहे, ” असेही गुलेरिया म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button