भारताकडून मिळालेल्या लाजीरवाणी पराभवानंतर इंग्लंड संघावर रोष व्यक्त केला मायकेल वॉनने, म्हणाला- ३-१ ने जिंकेल टीम इंडिया

Michael Vaughan lashes out at England after embarrassing loss to India, says Team India will win 3-1 sport news in marathi

मायकेल वॉन (Michael Vaughan) म्हणाले की, पुढील दोन कसोटी सामन्यांमध्येही जर चेंडू पहिल्या दिवसापासून फिरला तर भारतीय संघ मालिकेत ३-१ने विजयी होईल. इंग्लंडच्या संघाला आशिया खंडातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला आहे.

चेन्नई येथे भारत विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडला ३१७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंड क्रिकेट संघावर रोष व्यक्त केला. मायकेल वॉनने इंग्लंडच्या संघ निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दणदणीत पराभव झाल्यानंतर मायकेल वॉनने ट्विटरवर लिहिले आहे की, ‘मला वाटले की २०१९ पासून इंग्लंड संघाची पहिली पसंत म्हणजे कसोटी क्रिकेट आहे आणि इंग्लंडचा संघ बर्‍याच प्रयत्नांनी अ‍ॅशेस ट्रॉफी परत मिळवेल, परंतु प्रत्येक आठवड्यात कसोटी संघ सतत बदल होत आहे, परंतु टी -२० संघ पूर्ण सामर्थ्याने खेळत आहे. मोईन आता १८ महिन्यांत पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर मायदेशी परतणार आहे.’

ट्विटरवर मायकेल वॉनने असेही म्हटले आहे की या परिस्थितीत भारतीय संघ खूप चांगला होता. जर आणखी दोन कसोटी सामन्यांमध्ये चेंडू पहिल्या दिवसापासून फिरला, तर भारतीय संघ मालिकेत ३-१ ने जिंकेल. इंग्लंडच्या संघाला आशिया खंडातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या धावांच्या बाबतीत हा भारताचा सर्वात मोठा विजय आहे.

इंग्लंडचा सर्वात मोठा पराभव

चेन्नईत खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडला ३१७ धावांनी पिछाडीवर टाकत भारताने शानदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाच्या हातून होणारा हा पराभव इंग्लंड फार काळ विसरणार नाही. त्यांच्या ८९ वर्षांच्या कसोटी इतिहासात (१९३२-२०२१) इंग्लंडवर भारताच्या धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे.

टीम इंडियाने यापूर्वी १९८६ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात लीड्समध्ये इंग्लंडला २७९ धावांनी पराभूत केले होते, पण आता विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने इतिहास रचला आणि धावांच्या बाबतीत इंग्लंडचा सर्वात मोठा कसोटी विजय नोंदविला. या प्रकरणात कोहलीने कपिल देवचा विक्रम मोडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER