दोनच दिवसात सामना संपल्याने प्रक्षेपकांनी भरपाई मागावी – वॉनची सूचना

Michael Vaughan

अहमदाबादची (Ahmedabad) तिसरी कसोटी आटोपून दोन दिवस झाले असले तरी या सामन्याच्या खेळपट्टीबद्दलचा वाद शमायला तयार नाही. इंग्लंडच्या गटातर्फे नरेंद्र मोदी स्टेडियमवरची (Narendra Modi Stadium) खेळपट्टी कसोटी सामन्यालायक नव्हतीच असा सूर कायम ठेवला आहे तर भारतीय गटातर्फे इंग्लंडचे फलंदाज खराब खेळले आणि खेळपट्टी खराब असण्यापेक्षा इंग्लिश फलंदाजांच्या मनातील भूतानेच त्यांचा घात केला अशी आपली भूमिका कायम राखली आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन (Michael Waughan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी ICC) वर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, भारतासारख्या यजमानांकडे असेच जेवढे दुर्लक्ष केले जाईल आणि त्यांना हवे ते करु दिले जाईल तेवढेच आयसीसी जास्त कणाहीन दिसेल. आयसीसीच्या अशा भूमिकेने क्रिकेटचे नुकसान होत असल्याचे त्याने म्हटले आहे. भारताच्या विजयाचेही हा उथळ विजय असे त्याने वर्णन केले आहे.

वॉनने म्हटलेय की पहिला सामना गमावल्यावर भारताने अशा खेळपट्ट्या बनवल्या ज्यावर पहिल्या चेंडूंपासून फिरक मिळत होती. ह्या खेळपट्ट्या दोन किंवा तीनच दिवस टिकतील हे त्यांनाही ठाऊक होते असे वॉनने म्हटले आहे. सामना लवकर संपला तर परतावा मिळावा अशी मागणी सामना प्रक्षेपण करणारांनी करायला हवी अशी सूचनाही त्याने केली आहे. अहमदाबाद कसोटीत तीन दिवसांचा खेळ झालाच नाही तरी त्यांना निर्मितीसाठी पैसे पूर्णच लागले असतील त्यामुळे यापुढे कसोटी सामन्यांचे हक्क घेण्याआधी ते दोनदा विचार करतील असे त्याने म्हटले आहे. कसोटी क्रिकेटच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी अशा खेळपट्ट्यांसाठी गुणांचा दंड करण्यात यावा अशीसुध्दा त्याने मागणी केली आहे.

लिटल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी याच्या उलट भूमिका घेताना म्हटलेय की जो कसोटी दर्जाच्या फलंदाज आहे त्याला खेळपट्टी कशीही असो , त्यावर फलंदाजी करता यायला हवी. फिरकी घेणारी असो की सरळ , खेळपट्टीला दोष देऊन फायदा नाही. आणि यष्टीरक्षकाप्रमाणे वाकून जो फलंदाजीचा स्टान्स घेईल तोच चेंडूच्या दिशेत येऊन खेळू शकेल आणि वळणा ऱ्या खेळपट्टीवर यशस्वी होईल.उभ्याने फलंदाजी करण्याचे तंत्र चूकीचे असल्याचे त्याने म्हटले आहे.

दरम्यान, अॕलिस्टर कूक व अँड्र्यु स्ट्रॉस यांनी विराट कोहली हा भारतीय मंडळाचीचभाषा (BCCI) बोलत असल्याचे आणि तो ग्राऊंडस्मन यांना वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) खेळपट्टीत कोणताही दोष नसल्याचे म्हटले होते.

कूकने म्हटलेयकी आम्हाला माहिती मिळालीय की या खेळपट्टीवर इतर कोणत्याही खेळपट्टीपेक्षा अधिक वळत होता. आमच्याकडेही फिरकी चांगली खेळू शकणारे खेळाडू आहेत पण तेसुध्दा या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसले असे कूक म्हणाला. जो रुट हे याचे उत्तम उदाहरण आहे, तो फिरकी चांगली खेळतो असेच नाही तर तो फाॕर्मातही होता तरी त्याला फक्त 19धावाच करता आल्या. त्यातही दोन-तीनदा तो सुदैवी ठरला. तेसुध्दा दुसऱ्याचदिवशी…म्हणून मी कूकच्या म्हणण्याशी सहमत आहे असे स्ट्रॉसने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER