मायकेल फेल्पस् म्हणतो, टोकियो आॕलिम्पिकही ‘क्लीन’ असण्याची शक्यता कमीच

Michael phelps

आॕलिम्पिक (olympic) इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू, जलतरणपटू (swimming) मायकेल फेल्प्स (Michael phelps) याला टोकियो आॕलिम्पिकमध्येही (Tokyo olympic) खेळाडू शक्तीवर्धक द्रवांचा वापर न करता प्रामाणिकपणे सहभागी होतील याबद्दल शंकाच वाटते. टोकियो आॕलिम्पिकमध्ये किती खेळाडू प्रामाणिकपणे सहभागी होतील या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला की 10 पैकी फक्त 4 किंवा 5!

या मुद्द्यावर तो म्हणाला की, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत खरं सांगायचं तर मी कधी प्रामाणिक खेळाडूंच्या स्पर्धेत सहभागी झालो का, याबद्दल शंकाच आहे. काही बदललंय असं मला वाटत नाही. याबाबत बरेच प्रश्न आहेत आणि मैदानातच कुणाला पकडले जात नाही ही चीड आणणारी बाब आहे. फेल्प्सने 8 वर्षांपूर्वी लंडन आॕलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदकं जिंकले होते. त्या आॕलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक लबाडी समोर आली होती. 130 अॕथलीटवर डोपिंग प्रकरणी एकतर बंदी आली होती किंवा त्यांना अपात्र तरी ठरविण्यात आले होते. त्यापैकी 68 जण हे पुर्नतपासणीत दोषी आढळले होते. आधीच्या आॕलिम्पिक मधील नमुन्यांची काही काळाने पुन्हा तपासणी करण्यात येते त्यात हे दोषी आढळले होते.

दरम्यान, न्यूयॉर्क टाईम्सच्या एका अहवालानुसार 2016 च्या रियो आॕलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या 11 हजार खेळाडूंपैकी किमान एक टक्का स्पर्धक हे डोपींगसाठी एकतर निलंबनाची शिक्षा भोगून आले होते किंवा त्यांना जिंकलेले पदक तरी परत करावे लागले होते.

फेल्प्सने डोपिंगच्या मुद्द्यावर नेहमीच आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. तो म्हणतो की कारकिर्दीत आपल्याएवढी वारंवार चाचणी कुणाचीच झालेली नसेल. इतर प्रत्येकाच्या बाबतीतही तसेच व्हायला हवे असा त्याचा आग्रह आहे. दुर्देवाने तसे होत नाही. सर्वांना जोवर एकसारखेच नियम लागू होणार नाहीत तोवर काहीच होणार नाही असे हा 35 वर्षीय जलतरणपटू म्हणतो.

या महिन्याच्या आरंभीच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोदचेन्कोव्ह अँटी डोपिंग कायदा मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये डोपिंगमध्ये अडकलेल्यांना गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई करता येणार आहे. रशियन डोपिंग स्कँडल उघडकीस आणणाऱ्या व्हिसलब्लोअर डॉ. ग्रेगरी रोदचेन्कोव्ह यांच्या नावावर हा कायदा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER