वर्णभेदाबाबत कौटुंबिक आठवण सांगताना मायकल होल्डिंग यांना अश्रू अनावर

Michael Holding sheds tears as he recounts family memories of apartheid

वेस्ट इंडिज : अश्वेत कुटुंबातही, अश्वेत (काळे) आणि जास्त अश्वेत (जास्त काळे) असा रंगभेद होतो! याबाबतचा अनुभव सांगताना वेस्ट इंडिजचे विख्यात माजी द्रुतगती गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी त्यांच्या कुटुंबातील रंगभेदाचा अनुभव सांगितला. म्हणाले – माझे वडील जास्त कृष्णवर्णीय (अश्वेत / काळे ) असल्याने आईच्या कुटुंबियांनी तिच्याशी बोलणे सोडले होते. मला माहिती आहे की ते कोणत्याही स्थितीमधून गेले आहेत. हा अनुभव सांगताना होल्डिंग याना अश्रू रोखता आले नाहीत.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अचूक आणि द्रुतगतीने मारा करून फलंदाजांना धडकी भरवण्याऱ्या वेस्ट इंडिजच्या गोंलदाजात मायकल होल्डिंग यांचा समावेश आहे. अमेरिकेत आफ्रिकन वंशाच्या नागरिकाचा पोलिसांच्या ताब्यात असताना छळामुळे मृत्यू झाल्यानंतर जगात वर्णभेदी विरोधी लढ्याला मोठे समर्थन मिळते आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने देखील या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाने वर्णभेदाला विरोध प्रकट केला. याबाबत मायकल होल्डिंग यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबातील हा ह्रदयस्पर्शी अनुभव सांगितला. याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा अनुभव सांगताना मायकल होल्डिंग वर्णभेदाच्या त्या आठवणीने इतके भावनावश झालेत की अश्रू रोखू शकले नाहीत. गळा भरून आल्याने काही क्षण त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.

वर्णभेदाविरुद्धच्या लढ्याबाबत ते म्हणाले की – वर्णभेदावर मानवजातीला शिक्षित न केल्यास हे असेच सुरू राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER