कमीत कमी खेळाडूत विजेतेपदाचा मुंबई इंडियन्सचा पराक्रम

Mumbai Indians IPL 2020

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाचव्यांदा आयपीएल (IPL) जिंकली. आयपीएल सर्वाधिक वेळा जिंकायचा विक्रम तर त्यांच्या नावावर आहेच पण आयपीएलच्या इतिहासातील त्यांचे हे पाचवे यश अतिशय विशेष आहे. आयपीएल विजेत्या इतर कोणत्याही संघाला ते जमलेले नाही ते म्हणजे अगदी कमी खेळाडूत त्यांनी हे विजेतेपद पटकावले.

आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये मुंबईने त्यांच्या सर्व 16 सामन्यांमध्ये फक्त 15 खेळाडूंनाच खेळवले. 9 खेळाडूंना त्यांनी बेंचवरच बसवले. याप्रकारे कमीत कमी खेळाडूंसह विजेतेपद पटकावण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

आयपीएलच्या इतिहासात एका मोसमात यापेक्षासुध्दा कमी खेळाडू चेन्नई सुपर किंग्जने 2015 मध्ये खेळवले होते पण ते विजेते ठरले नव्हते. त्यावर्षी 14 खेळाडूंना खेळवणारा चेन्नईचा संघ उपविजेता ठरला होता. मुंबई इंडियन्सने याच्याआधीसुध्दा 2018 च्या मोसमात 15 खेळाडूच खेळवले होते पण त्यावेळी ते पाचव्या स्थानी राहिले होते. यंदा मात्र विजेते ठरले आहेत. 2018 च्याच मोसमात कोलकाता नाईट रायडर्सने 16 खेळाडू खेळवले पण ते तिसऱ्या स्थानी राहिले. याप्रकारे कमीत कमी खेळाडूंसह विजेतेपद पटकावण्याचा विक्रम यंदा रोहितच्या संघाने केलाय.

यंदा मुंबईने ज्या खेळाडूंना खेळवलेच नाही त्यात आदित्य तारे, अनमोल प्रीत सिंग, अनुकूल राॕय, मिचेल मॕक्लेग्लन, शेरफेन रुदरफोर्ड, ख्रिस लीन, मोहसीन खान, दिग्विजय देशमूख, बलवंत राय सिंग यांचा समावेश आहे.

आणि मुंबईने जे 15 खेळाडू खेळवले त्यांची कामगिरी अशी..

खेळाडू ————– सामने ——-धावा —— विकेट
क्विंटन डी काॕक —- 16 ——- 503 ——- 0
सूर्यकुमार यादव —- 16 ——- 480 ——- 0
किरोन पोलार्ड —— 16 ——– 268 ——- 4
कृणाल पांड्या —— 16 ——– 109 ——- 6
जसप्रीत बुमरा —— 15 ———- 5 ——— 27
ट्रेंट बोल्ट ————- 15 ——— 0 ———- 25
राहुल चाहर ——— 15 ——— 2 ———- 15
इशान किशन ——– 14 ——— 516 —— 0
हार्दिक पांड्या ——- 14 ——— 281 —— 0
रोहित शर्मा ———– 12 ——— 332 —— 0
जेम्स पॕटिसन ——– 10 ———- 15 ——- 11
सौरभ तिवारी ——– 07 ——— 103 —— 0
नेथन कोल्टरनाईल — 07 ——— 25 ——– 5
जयंत यादव ———- 02 ———– 0 ——— 1
धवल कुलकर्णी —— 01 ———- 3 ———- 0

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER