दोनशेचे टारगेट दिले की मुंबईचा विजय पक्का

Sport newS-IPL 2020

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली आणि दोनशे धावा केल्या तर प्रतिस्पर्धी संघाने समजायचे की आपला पराभव पक्का! आयपीएलमध्ये (IPL) मुंबईने दोनशे धावांचे आव्हान दिलेला आपला प्रत्येक सामना जिंकला आहे. असे 11 सामने त्यांनी जिंकले आहे.

त्यातील सर्वात ताजा विजय रविवारी शारजात (Sharjah) सनरायजर्स हैदराबादविरुध्दचा (SRH) आहे. आणि असे सर्वाधिक चार विजय दिल्लीविरुध्द आहे.

दोनशेचे टारगेट दिल्यावर कधीही न हरणारा मुंबईचा संघ दोनशेपुढील टारगेट घेतल्यावर मात्र तीन वेळा हरला आहे. त्यात यंदा आरसीबीसोबत टाय झालेला आणि सुपर ओव्हरमध्ये हरलेला सामनासुध्दा आहे.

मुंबईने जिंकलेले 200+ धावांचे टारगेट दिलेले सामने

 • 2010- वि. दिल्ली -98 धावा
 • 2010- वि. राजस्थान रॉयल्स- 4 धावा
 • 2013- वि. राजस्थान रॉयल्स- 33 धावा
 • 2013- वि. दिल्ली- 44 धावा
 • 2015- वि.बंगलोर- 18 धावा
 • 2015- वि. चेन्नई- 51 धावा
 • 2016- वि. दिल्ली- 80 धावा
 • 2017- वि. दिल्ली- 146 धावा
 • 2018- वि. बंगलोर- 46 धावा
 • 2018- वि. कोलकाता- 102 धावा
 • 2020- वि. हैदराबाद – 34 धावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER