मुंबईचे 2019 व 2020 मध्ये ‘सेम टू सेम’ निकाल

Mumbai Indians

आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने आता गती पकडली आहे. आपल्या पहिल्या सहा सामन्यांपैकी चार आणि लागोपाठ तीन सामने जिंकून ते आता पहिल्या स्थानी आहेत. गेल्यावर्षीसुध्दा त्यांची अगदी अशीच सुरुवात होती आणि थेट विजेतेपदावरच ते थांबले होते. यंदासुध्दा तसेच होईल का, अशी चर्चा आता 2019 व 2020 मधील ‘सेम टू सेम’ निकालांच्या या योगायोगावरुन सुरु झाली आहे.

हे सेम टू सेम निकाल कसे

निकाल — 2020 —– 2019

पराभव — सीएसके — दिल्ली
विजय —- केकेआर — आरसीबी
पराभव — आरसीबी – पंजाब
विजय —- पंजाब —– सीएसके
विजय —- हैदराबाद — हैदराबाद
विजय —- राजस्थान — पंजाब

याप्रकारे पराभव- विजय- पराभव- विजय – विजय -विजय अशी मुंबईची निकालांची सेम टू सेम मालिका सलग दुसऱ्या वर्षी कायम आहे. गेल्या वर्षी सातवा सामना ते राॕयल्सकडून हरले होते. आता यंदाचा त्यांचा सातवा सामना 11 तारखेला दिल्लीशी आहे. त्यात काय होते ते कळेलच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER