म्हाडा फ्लॅट्स टाटा कॅन्सर रुग्णालयाला सोपवणार; जितेंद्र आव्हाड यांची माहीती

Jitendra Awhad

मुंबई : कॅन्सरग्रस्तांच्या सोयीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे म्हाडाचे १०० फ्लॅट्स सोपवले जाणार आहे, अशी माहीती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुंबईतील टाटा हॉस्पिटलचे अधिकारीदेखील यावेळी उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मुंबईत अनेकदा दिसून येते की, बरेच रूग्ण किंवा रूग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यांवर पडून रहावे लागते. हे दृश्य पाहून अत्यंत वाईट वाटते. म्हणून मानवतेच्यादृष्टीने विचार केला की, आमच्याकडे जेवढे फ्लॅट्स आहेत, आज १०० फ्लॅट्स व आगामी काळात वाढवून २०० करणार आहोत आणि हे फ्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे सोपवणार आहोत. म्हाडाचा फ्लॅट्सशी काहीच संबंध राहणार नाही. याचे कारण असे की, यामध्ये राजकीय हस्तक्षेप येईल. तो आम्हाला नको आहे, ज्यांना खरच गरज आहे, त्यांना त्याचा लाभ मिळायला हवा. म्हणून हे फ्लॅट्स टाटाला देण्याचा निर्णय़ घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ सात दिवसांमध्ये झाली. याचा मला अभिमान आहे. टाटा व म्हाडामध्ये तसा करारदेखील झालेला आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER