शिर्केनी उभारलेल्या अवैध इमारतीचे म्हाडाने अदा केले १९ कोटी

मुंबई : मनपा च्या परवानगीविनाच मेसर्स शिर्के कंपनी ने कालीना येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘मैत्री’ इमारतीत करण्यात येणारे अवैध निर्माण चर्चेत आहे. म्हाडाने मनपाच्या परवानगीविनाच अवैध निर्माणावर खर्च करण्यात आलेली ९४ टक्के रक्कम शिर्के यांना देण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. याची माहिती आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी दिली. म्हाडाने शिर्के यांना १८ कोटी ८३ लाख इतकी रक्कम दिली आहे.

म्हाडा विधी मंडळाच्या विभागीय लेखापाल यांनी अनिल गलगली यांनी विचारलेल्या माहिती च्या उत्तरात उच्चवर्गीयांच्या ७२ खोल्यांच्या इमारतीत वर ३१ मार्च २०१७ पर्यंत २० कोटी १४ लाख ७८ रुपये खर्च कारणात आले होते म्हाडा ने ३१ मार्च २०१७ मेसर्स बी जी शिर्के कंपनी ला न ८ कोटी ८३ लाख ८० रुपये देण्यात आल्याची माहिती आहे. अनिल गलगली यांनी म्हाडा च्या कार्यप्रणाली वर आक्षेप घेत अवैध निर्माणची खर्चाची रक्कम अदा करण्याच्या अगोदर मनपाची परवानगी घेण्याची आवश्यकता होती. ज्याला दुर्लक्षित केल्या गेले. मनपा जर या अवैध निर्माण ला तोडेल तर जे करोडोचे भुगतान करण्यात आले आहे . ती रक्कम शिर्के कडून वसूल करणे सोपे ठरणार नाही.

म्हाडा प्रशासनाने अनिल गलगली यांना सांगितले की, मेसर्स बी जी शिर्के कंपनी ला २ मार्च २०१७ ला नोटीस जरी करून अवैध निर्माण संदर्भात ७ दिवसाच्या भितर माहिती मागितली . म्हाडा ने मैत्री सहकारी गृह निर्माण संस्थेत एकूण ७६ सदस्य व्यतिरिक्त शेष आणि सरकार ने मंजूर केलेल्या सदस्याकरिता १५ फ्लॅट उपलब्ध कर्णाची मंजुरी दिली होती. विंग ए करीता ३ आणि विंग बी करीता २ फौरची अनुमती असतानाही मेसर्स शिर्के या ठेकेदाराने १२ फ्लोर निर्माण केला आणि त्या नंतर अवैध निर्माण ला अधिकृत करण्याची विनंती केली.

मुख्यमंत्री सचिवालयापासून उपमुख्यमंत्री कार्यालय म्हाडा, एसआर , गृहनिर्माण, ग्रामविकास, नगरविकास, सहकार , राजस्व, भ्रष्टाचार निरोधक ब्युरो, सार्वजनिक स्वास्थ मनपा, सिडको, शिक्षा, जलसंपदा,कृषी, महिला व बालविकास, उद्योग, सूचना व तंत्र, पोलीस, विक्रीकर, रहदारी अशा प्रत्येक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याना फ्लॅट मिळेल. ४ प्रमोटर ला मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकार अभिमन्यू काळे , पोलीस उपायुक्त सुनील रामानंद , गृहनिर्माण राज्यमंत्री चे खाजगी सचिव कैलास पगारे आउट गृह निर्माण विभागाचे उपसचिव आणि अप्पर जिल्हाधिकारी दिलीप शिंदे ,अप्पर अधिकारी ए. एम. वजरकर आहे.