मेट्रो मॅन ई. श्रीधरन भाजपच्या वाटेवर

नवी मुंबई : भारताचे मेट्रो मॅन (Metro Man) ई. श्रीधरन (E Sreedharan) आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राजकीय इनिंग सुरू करणार आहेत. २१ फेब्रुवारी रोजी केरळमध्ये काढण्यात येणाऱ्या विजययात्रेमध्ये ते सदस्यत्व स्वीकारणार आहेत. श्रीधरन हे भाजपकडून केरळमधून निवडणूक लढवू शकतात.

याबाबत माहिती देताना केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन म्हणाले, २१ फेब्रुवारी रोजी कासरगोड येथून पक्षाची विजययात्रा सुरू होणार आहे. त्यावेळी श्रीधरन पक्षात सहभागी होणार आहेत. या वर्षातच केरळमधील निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणारी रथयात्रा तिरुवनंतपुरम येथे संपणार आहे.

मेट्रो मॅन म्हणून श्रीधरन यांना ओळख मिळण्याआधी त्यांचे नाव ऐतिहासिक कोकण रेल्वे प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे घेतले जाते. १८८० पूल आणि ९१ बोगदे असा प्रवास करणारी कोकण रेल्वे श्रीधरन यांच्यामुळे धावू लागली. तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांना कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक बनवले होते. या प्रकल्पात त्यांनी झोकून देऊन काम केले होते. दिल्ली मेट्रो आणि देशातील अन्य मेट्रो प्रकल्पाची आखणी आणि पूर्णत्वाची जबाबदारी श्रीधरन यांनी पेलली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER