#MeToo : आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

aloknath

मुंबई : सध्या देशात #MeToo मोहीम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्यावरील झालेल्या अत्याचाराबाबत वाचा फोडली आहे. या मोहिमेच्या फेऱ्यात अडकलेले अभिनेते आलोकनाथयांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिल्ममेकर विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी मंगळवारी २० नोव्हेंबर रोजी ओशिवरा पोलिसांनी आलोकनाथ यांच्याविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

ही बातमी पण वाचा : #MeToo: आलोक नाथ यांचे ‘सिन्टा’चे सदस्यत्व रद्द

८ ऑक्टोबरला विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांच्याविरोधात एक लेखी तक्रारपत्र ओशिवरा पोलिसांना दिले होते. त्या तक्रारीमधील खरी माहिती जाणून घेतल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल,असे ओशिवरा पोलिसांनी सांगितले होते. अखेर मंगळवारी आलोकनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जबरी आणि अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी भादवी ३७६(१) आणि ३७७ ही कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.

याप्रकरणी अद्याप आलोक यांना अटक करण्यात आली नाही. यादरम्यान,विनिता नंदा यांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा आलोकनाथ यांनी केला होता. त्यानंतर २५ ऑक्टोबरला त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नव्हता.