‘मेट गाला 2017’ मध्ये प्रियंकाचा घायाळ करणारा लुक!

न्यूयार्क : बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये स्थिरावलेली देसी गर्ल प्रियंका चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अदाकारीने सर्वानाच घायाळ करून सोडले आहे. आता पुन्हा एकदा आपली ही देसी गर्ल चर्चेत आली आहे. ती म्हणजे आपल्या सिनेमासाठी नव्हे तर ‘आपल्या लांबच लांब गाऊनसाठी.’

नुकतीच प्रियंका ‘मेट गाला 2017’ मध्ये सहभागी झाली होती. नेहमी प्रमाणे या वेळेसही तिनं हॉलिवूड कलाकारांमध्ये स्वतःची छाप जरा हटके पद्धतीने पाडली. सेक्सी आणि हॉट लुकनं प्रियंकानं उपस्थितांची मन जिंकली. अमेरिकेतील टीव्ही मालिका क्वांटिकोमध्ये आपल्या अभिनयाने लोकांना झाप पाडणारी प्रियंकानं कॉलर कोट परिधान केला होता. प्रियंकाचा हा ड्रेस साऱ्यांनाच आकर्षित करत होता.

या सोहळ्यात प्रियंकाने रेड कार्पेटवर Ralph Lauren च्या खाकी रंगातील ट्रेंच कोट परिधान केला होता. या गाउनसोबत तिनं काळ्या रंगाचे बुटही घातले होते. डोळ्यांवर केलेला स्मोकी मेकअपमुळे ती आणखीनच छान दिसत आहे.

दरम्यान,’ प्रियंकानं तर आपल्या या अवतारामुळे हॉलिवूडमधील मोठ-मोठ्या अभिनेत्रींनाही मागे सोडलं आहे. तिच्या या लुकची आंतरराष्ट्रीय मीडियानं खूप वाहवाई केली आहे. प्रियंका चोप्रा पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिला ‘मेट गाला’मध्ये एन्ट्री मिळाली आहे. प्रियंका चोप्राचे या सोहळ्याला हजेरी लावणं यासाठीही विशेष मानले जाते कारण हॉलिवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी यात सहभागी होतात.