मेस्सीने दाखवून दिले; वादविवाद आणि खेळाचा संबंध नसतो

Lionel Messi

बार्सिलोना (Barcelona) क्लब सोडून जाणार या चर्चेतून मध्यंतरी उदभवलेले वाद व नाराजी याचा आणि खेळाचा काहीही संबंध नाही हे लियोनेल मेस्सीने (Lionel Messi) दाखवून दिले आहे. सेल्टो व्हिगो क्लबवरील बार्सिलोनाच्या 3-0 अशा शानदार विजयात सर्व शंकाकुशंकांना मूठमाती देत त्याने दमदार खेळ केला. बार्सिलोनाचे प्रशिक्षक रोनाल्ड कोएमन (Ronald Koeman) यांनीसुध्दा मेस्सीच्या खेळ सर्वोच्च या मनोवृत्तीचे कौतुक केले असुन तो एक आदर्श कर्णधार तर आहेच शिवाय संघातील इतर सदस्यांसाठीही समर्पित खेळाडू कसा असावा याचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात पूर्ण वेळ बार्सिलोनाचा संघ मेस्सीच्या नेतृत्वात दहाच खेळाडूंसह खेळला. कोएमन म्हणाले की, बार्सिलोनाकडेच राहणार हे निश्चित झाल्यावर मेस्सीने पहिल्या दिवसापासून सराव गंभीरतेने केला, खेळही चांगला केला आणि संघासाठी व सहकाऱ्यांसाठी सर्वोत्तम ते देण्याचा प्रयत्न केला. सेल्टाविरुध्द दहा खेळाडूंसह खेळताना त्याने स्वतःला पुन्हा एकदा सिध्द केले. तो सर्वोत्तम खेळाडू आहे याबद्दल वादच नाही. बार्सिलोनाशी जुळलेलो नव्हतो तेंव्हासुध्दा आणि आतासुध्दा माझे हेच मत आहे. कर्णधार कसा असावा याचे तो उत्तम उदाहरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER