अनंत चतुर्दशीला देणार जिल्ह्यातील ३७ हजार ९०५ बाप्पांना निरोप

३७ हजार ९०५ बाप्पांना निरोप

रत्नागिरी(प्रतिनिधी) :  रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या धामधुमीत सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होणार आहे. गेले दहा दिवस भक्तिभावाने पूजलेल्या बाप्पांना उद्या अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३७ हजार ८४१ घरगुती व ६४ सार्वजनिक मिळून एकूण ३७ हजार ९०५ गणेशमूर्तींचे विसर्जन गुरुवारी होणार आहे.

रत्नागिरी शहर पोलिस स्थानकांतर्गत ११७९ खासगी व ८ सार्वजनिक, ग्रामीण पोलिस स्थानकांतर्गत १५५१ खासगी, जयगडमध्ये ६६३ खासगी व १ सार्वजनिक, संगमेश्वर येथे ३६१२ खासगी व १ सार्वजनिक, राजापूरमध्ये ६१६१ घरगुती व २ सार्वजनिक, नाटेत ११६१ घरगुती व २ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार आहे. लांजामध्ये १६४५ घरगुती व ६ सार्वजनिक, देवरूखमध्ये ३७९२ खासगी व २ सार्वजनिक, सावर्डेत ७७८ घरगुती व २ सार्वजनिक, चिपळूणात ६५८२ घरगुती व ११ सार्वजनिक, गुहागरात ४३५० घरगुती व १ सार्वजनिक, अलोरेत १०० घरगुती व ३ सार्वजनिक, खेडमध्ये २११४ घरगुती व १२ सार्वजनिक, दापोलीत २४२१ घरगुती व ६ सार्वजनिक, मंडणगडमध्ये ४१० घरगुती व ५ सार्वजनिक, बाणकोटमध्ये १५० घरगुती व २ सार्वजनिक, पुर्णगडात ९६१ घरगुती, दाभोळमध्ये १७९ घरगुती व १ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.

रत्नागिरी शहरातील श्री रत्नागिरीचा राजा (मारूतीमंदिर) तर रत्नागिरीचा राजा (आठवडाबाजार) या दोन सार्वजनिक गणेशोत्सवाचे विसर्जन अनंतचतुर्दशीच्या दुसरे दिवशी अर्थात् दि.१३ रोजी होणार आहे. दि.१३ रोजी बाराव्या दिवशी जिल्ह्यातील ९ घरगुती व ९ सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जित करण्यात येणार आहेत. सोळाव्या दिवशी (दि.१७) तीन सार्वजनिक तर एकविसाव्या दिवशी (दि.२२) ७२ खासगी व दोन सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे