महिलांना खऱ्या अर्थानं ‘आत्मनिर्भर’ बनवणाऱ्या वनाधिकारी मेधावी ‘कीर्ती’ !

a forest officer who makes women - Maharastra Today
a forest officer who makes women - Maharastra Today

उत्तराखंडच्या बांदसरी गावात निर्मलादेवी पवार आणि इतर दहा महिलांनी आटा, डाळ, हरभरा आणि रोडोडेंड्रॉन फळांचा ज्युस बाजारात विकत आहेत. शेतीमाल या महिला एकत्र करतात, त्याला साफ करून वेगवेगळे पदार्थ बनवतात. याचं पॅकिंग करून प्रवाशांना विकतात. कधी विक्री इतकी चांगली होते की दिवसाचे २५०० रुपये निव्वळ नफा त्यांच्या हाती पडतो.

या गावातल्या १०० महिलांनी हा मार्ग अवलंबलाय. यामुळं त्यांच्या कमाईतही वाढ झाली. उत्तराखंडच्या ‘भद्रिगड’ रेंज अंतर्गत वन विभागीय क्षेत्रात राहतात. या रेंजमध्ये पाच गावांचा समावेश करण्यात आला. महिलांना आर्थिक  सक्षमीकरणाचं श्रेय जातं वन अधिकारी ‘मेधावी कीर्ती’ यांना. ३० वर्षीय मेधावी कीर्ती महिला सक्षमीकरणाचा उद्देश घेऊन कामावर रुजू झाल्या. त्यांनी ‘धात्री’ म्हणजे आई- या नावानं महिलांना कमाईच्या नवनव्या वाटा शोधून दिल्या. यामुळं त्यांची कमाई १० पट वाढली. मे २०२०मध्ये याला सुरुवात झाली होती. काही महिलांनी उपलब्ध साधनसामग्री एकत्र करून त्यातून जैविक खताद्वारे उत्पादन सुरू केलं. रसायनमुक्त खाद्यान्नाची विक्री करणं त्यांचं प्रमुख ध्येय आहे.

महिलांच्या समस्या जाणून घेतल्या

मेधावी यांनी लहानपणातच वडिलांना गमावलं. सर्व जबाबदारी त्यांच्या आईच्या खांद्यावर येऊन पडली होती. आईला रात्रंदिवस कष्ट करताना त्या पाहात होत्या. मेधावी यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईंनी घेतलेली मेहनत त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितली होती. यामुळंच त्यांनी वन अधिकारी पदापर्यंत मजल मारली. महिलांची आर्थिक अडचण त्यांना समजत होती. या समस्येवर काही उपाय निघावा. महिलांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळवा यासाठी काम करण्याचं त्यांनी ठरवलं. नोकरीवर रुजू झाल्यानंतर लगेच चार महिन्यांत वरिष्ठांची परवानगी घेत महिलांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

सर्वांत  आधी २५ महिलांना हळद, साबण, सौंदर्य प्रसाधन, अगरबत्ती, औषधी वनस्पती आणि तेल, शँपू, इतर कच्चा माल आणि इतर वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. सर्व कृषी उत्पादनापासून काहीना  काही बनवण्यास सुरुवात करण्यात आली. राजमा, डाळ, धान्य या गोष्टी रसायनमुक्त आहेत. या गोष्टींचं  उत्पादन घेताना शेतकरी अत्यल्प रासायनिक खत वापरतात. ऑक्टोबर महिन्यात ‘धात्री’ नावानं दुकान उघडण्यात आलं. धात्री काही दिवसांतच ब्रँड बनला. तिथं १०० उत्पादनं ठेवण्यात आली. त्यांच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण महिलांनी दिवाळीच्या सणात हजारो रुपये कमावले.

या महिलांपैकी एक आहेत- शालिनी भंडारी.  त्यांनी गाईच्या शेणापासून अगरबत्ती, मूर्ती  इत्यादी गोष्टी बनवून विकल्या. पहिल्यांदा विक्री कमी होती. दरमहिन्याला कसं तरी आठ हजार रुपये त्या कमवायच्या. आता त्यांचा व्यवसाय एक लाखाच्या घरात गेला. २१ वर्षीय शालिनी आता आर्थिक स्वावलंबी झाल्या. महिलांना कुठं जावं लागत नाही. घरातूनच इतर गोष्टी सांभाळता येतात. त्यामुळं कामावर खूश असल्याचं शालिनी म्हणतात.

गावांना गावं जोडली गेली

धात्रीची यशोगाथा इतर गावांपर्यंतही पोहचली. अनेक महिलांनी स्वतःला धात्रीसोबत जोडून घेतलं. मेधावी यांच्याशी संपर्क करून त्या धात्री परिवाराचा हिस्सा झाल्या. त्यांना सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण देण्यात आलं. नंतर महिलांनी उत्पादनाला सुरुवात केली. ‘धात्री’ ब्रँडच्या अंतर्गतच सर्व माल विकला जातो. वन विभागानं चांगल्या पद्धतीनं मार्केटिंगसाठी साहाय्यता  केली.

मेधावी यांच्यामुळं महिलांना बिझनेस मॉडेल मिळालं. महिलांमध्ये नवा जोश आणि आत्मविश्वास जागृत झाल्याचं दिसून येतं. सुरुवातीच्या काळात महिलांना यात सामील करणं अवघड होतं. महिलांना विश्वासात घेऊन सर्व बाबी पटवून देण्यात आल्या. महिलांनी आता नवनव्या उद्योग व्यवसायांकडे मोर्चा वळवलाय. शेती उत्पादनासोबत पानांपासून बनलेल्या प्लेट्सदेखील त्या बाजारात आणल्या आहेत. मेधावी यांच्या प्रयोगामुळं अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा प्रश्न सुटला. ‘रेंजरदीदी’ म्हणून मेधावी यांची ओळख स्थानिक भागात निर्माण झाली.

ही बातमी पण वाचा : जेंव्हा मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश नव्हता, तेंव्हा ‘या’ महिलेनं फिजिक्समध्ये पी.एच.डी. केली…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button