राष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा – रामदास आठवले

Ramdas Athavale & Sharad Pawar

मुंबई : पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष असावा अशी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मागणी आहे. यावरून काँग्रेसमध्ये उठपटक सुरू आहे. राजकारणात अफलातून उपाय सुचवणारे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी या वादावर उपाय सुचवला – राष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा! आठवले यांनी ट्विट केले आहे – काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत.

माझी काँग्रेसला सूचना आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार (Sharad Pawar) यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा. या आधीही अशाच पद्धतीची सूचना करण्यात आली होती. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र गांधी घराण्याशिवाय इतर कोणी अध्यक्ष व्हावे, अशी सूचना करण्यात आली होती.  त्यासाठी कुणीही तयार नाही.

काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती.  ती त्यांनी मान्य केली नाही. गुलाम नबी आझाद यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी सोनियांना पत्र पाठवून काही सूचना केल्या होत्या. या पत्राने काँग्रेसमध्ये वादळ निर्माण झाले होते. आरोप – प्रत्यारोप झाले होते. आता आणखी सहा महिने सोनिया गांधी याच अध्यक्ष राहणार असून त्यानंतर पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER