औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’च करा – सुभाष देसाई

Subhash Desai

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पंचवीस वर्षांपूर्वी शहराचे ‘संभाजीनगर’ (Sambhaji Nagar) नामकरण केले आहे. त्यामुळे औरंगाबादचा (Aurangabad) शहरातील नागरिकांनी संभाजीनगर असाच उल्लेख करावा, असे आवाहन शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केले. नामांतराचा प्रशासकीयस्तरावर प्रस्ताव लवकरच मंजूर होईल असे त्यांनी सांगितले. ते पडेगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

शहरात झपाट्याने विकास कामे होत असून, देशात गाजलेला कचरा प्रश्न आता मार्गी लागला आहे. एक हजार ६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा नारळ फुटला आहे. लवकरच पाणीप्रश्न मार्गी लागेल. शहर स्मार्ट होते आहे. त्याला अधिक उंचीवर न्यायचे आहे. ‘सुपर संभाजीनगर’ करायचे आहे, असे देसाई म्हणालेत.

सुभाष देसाई यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन शनिवारी झाले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER