महिलेस अश्लील संदेश, व्हिडीओ पाठवणाऱ्या परप्रांतीय युवकाला मनसैनिकांकडून चोप

Mansainiks

मुंबई :- एका महिलेस अश्लील व्हिडीओ व संदेश पाठवणाऱ्या मूळच्या उत्तर प्रदेशच्या २२ वर्षीय युवकाला मनसैनिकांनी चोप देऊन तोंडाला काळे फासले. त्याला लेखी माफी मागायला लावल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मीरारोड येथे रविवारी घडली.

काशिमीरा प्रभाग १४ मध्ये मनसेचे संपर्क कार्यालय आहे. रविवारी कार्यालयात एक महिला तक्रार याबाबतची घेऊन आली. एक तरुण हा आपणास सतत अश्लील व्हिडीओ व संदेश पाठवत असून त्यामुळे मी मानसिक तणावाखाली आले आणि घाबरले असल्याचे त्या महिलेने सांगितले. मनसे पदाधिकारी सचिन जांभळे, सचिन साळुंके, रवींद्र शेलार, करण हरिजन, व अविनाश शिरसाठ यांनी त्या तरुणाशी संपर्क साधून त्याला मीरारोडच्या सृष्टी येथील सूर्या शॉपिंग सेंटर जवळून पकडले आणि मनसे कार्यालयात आणले. २२ वर्षाचा सिंग आडनावाचा तो तरुण सोमवारी सकाळी उत्तर प्रदेश येथे मूळ गावी जाण्यास निघणार होता. पण मनसैनिकांनी त्याला पकडून कार्यालयात आणले आणि चांगलाच चोप दिला. त्याच्या तोंडावर काळे फासून, अश्याप्रकारचे कृत्य यापुढे करणार नाही, असे लिहूनही घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button