स्मरणशक्ती , पण विस्मरणाचीही शक्ती

Memory

हाय फ्रेंड्स ! तुम्ही म्हणाल की स्मरणशक्ती ही नक्कीच एक महत्त्वपूर्ण बाब आहे. खरेय ते ! कारण लहानपणापासूनच आपण सगळेजण स्मरणशक्तीसाठी खूप धडपडत असतो. मग आजी श्लोक पाढे पाठ करायला लावते, तर आई बदाम भिजत घालते आणि ते खाऊ घालते. वेगवेगळे बुद्धिवर्धक टॉनिक जसजसे मुले वरच्या वर्गात जातात तसे घरचे लोक मुलांना द्यायला लागतात. आणि त्या त्या कंपन्यांचा फायदा होत राहतो.

कारण लहानपणापासूनच आपण मानत आलो आहे की स्मरणशक्ती म्हणजे हुशार विद्यार्थी!स्मरण म्हणजे काय तर लहानपणी आपण म्हणतो आणि आपले पालकही म्हणतात, त्याप्रमाणे परीक्षेचा पेपर लिहिताना सगळी उत्तरं जशीच्या तशी आठवणं म्हणजे स्मरण! त्यासाठी घोकंपट्टी करीत राहणं हाच एकमेव मार्ग असतो. मग वक्तृत्व स्पर्धा झाली की आईने किंवा आणखीन कोणी लिहून दिलेलं आणि आपण पाठ केलेलं भाषण जसंच्या तसं करता येणे हे सुद्धा चांगली स्मरणशक्ती असल्याचे लक्षण मानलं जातं आणि जात असे. बरेचदा असं लक्षात येतं की पालक आपल्या मुलांना वक्तृत्व स्पर्धेचे भाषण लिहून देतातच आणि त्याचे पाठांतरही आवाजाच्या उच्यारासह ,हावभावांसह करून घेतात. परंतु त्या भाषणातले बरेचसे शब्द त्या मुलाला कळतातच असेही नाही ,सुभाषित कळतात असं नाही .पण स्मरणशक्तीच्या जोरावर तो विद्यार्थी बाजी मात्र मारतो.

बऱ्याच शाळांमधून अजूनही बोर्डांवर प्रश्नांची उत्तरं लिहून दिली जातात. ती मुले आपल्या वह्यांमध्ये उतरवतात आणि पाठ करतात. तशीच्यातशी उत्तरे परीक्षेत लिहिली जातात, प्रश्नही तेच विचारले जातात. आणि लिहून दिलेल्यापेक्षा वेगळी उत्तरे ज्यांनी लिहिले असतील त्यांना मार्क मिळत नाहीत असाही अनुभव येतो.

त्याचप्रमाणे बरेचदा परीक्षेमध्ये निसर्ग चित्र काढायला सांगितलेले असते. अशावेळी एखाद्या मुलीने तिच्या खिडकीतून दिसणारे काळे आकाश ,त्याच्यातील चांदण्या आणि चंद्रकोर असे जर काढले असेल तर तिला कमी मार्क मिळतात. कारण जर विचारलं तर निसर्ग चित्र म्हणजे टिपिकल डोंगर, त्यातुन उगवणारा सूर्य, तिथून निघणारी पायवाट किंवा नदी, एक लहानशी झोपडी, उडणारे पक्षी, गवत खाणारी गाय, एखादे मोठे झाड असं आणि असंच अपेक्षित असतं ! दुर्दैवाने आपल्याकडे बुद्धिमत्ता आणि शिक्षण ,जीवन कौशल्य आणि शिक्षण ,वास्तवता आणि शिक्षण यांची फारकत झालेली असल्यामुळे फक्त आणि फक्तच स्मरणशक्ती ,घोकंपट्टी आणि त्यातून मिळणारे यश एवढीच केवळ यशाची कल्पना झाली आहे.

मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर विनोबांच्या वाक्य धक्का बसतो. ते म्हणतात,”विस्मरण हीसुद्धा शक्तीच आहे.”आणि मग त्यावर जसजसा विचार करू लागले तसतसा लक्षात आलं की खरच जर विस्मरण नसतं तर ? स्मरण हे दोन पातळ्यांवर असतं. एक शॉर्ट मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी ! शॉर्ट मेमरी मध्ये काल कुणीतरी निरोप दिला असेल, तो पण सांगतो आणि नंतर काम झाले की विसरून जातो. किंवा आजकाल चा ओटीपी नंबर. काम झाल्यावर विसरून जातो.

परंतु काही गोष्टी मात्र दीर्घकाळापर्यंत आपल्या स्मरणात राहतात. मी जेव्हा माझ्या जुन्या कॉलनीत राहायचे तिथे असणाऱ्या फुलझाडांचा सुगंध माझ्या खूप स्मरणात आहे. आजीने पूजा केल्यानंतर ती एक ठराविक उदबत्ती लावायची तो सुगंध माझ्या इतका लक्षात आहे की तो कुठेही आला आला तर मला आजीची आठवण येते. तसेच काकूच्या हाताची आमटी तिची वही माझ्या अशीच अजून जिभेवर रेंगाळते. या सगळ्या सुखद आठवणी या दीर्घकालीन स्मरणाचा आहेत.

काल आम्ही मुलाचे ड्रॉवर आवरत असताना, त्याच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी सापडत होत्या. त्याच्याभोवती अनेक सुखद अशा आठवणी होत्या. छोट्या-छोट्या डायरिज, त्यात त्यांनी केलेल्या नोंदी ,दिनचर्या, मोठ्या व्यक्तिमत्व असणाऱ्यांच्या सह्या. आणि एवढंच काय तर त्यालाही होत होता की हे डायरी मी निराला बाजार मध्ये एका दुकानात बाबां बरोबर जाऊन पाचव्या वाढदिवसाला घेतली होती. त्यावेळी तिथे दाखवणारा जो माणूस होता त्यांना हाताची बोटे नव्हती. इतक्या बारकाव्यांसकट गोष्टी लक्षात हात असतात.

पण अशा सुखद आठवणी असतात तशा दुःखद ही आठवणी असतात. त्या तशा अल्पकालीन असतात तशाच दीर्घकालीन असतात. परंतु जर आपल्याला विस्मरण वाच नसते तर काय झाले असते ? विचार करा बरं ! वर्षानुवर्ष कोणी बोललेले शब्द, केलेले अपमान, वाट्याला आलेले अपयश, कुठलंही दुःख बसलेला धक्का झालेला विश्वासघात, प्रिय जनांचा वियोग, कोणी आपल्याशी केलेले दुर्वर्तन आणि त्यामुळे मनावर ओढले गेलेले ओरखडे! हे सगळं सगळं कसं येणार होतो आपण ?
असोसिएशन ऑफ इमॅजिनेशन म्हणजे कल्पनांचा अनुषंग म्हणून सूत्र मांडले जाते.

म्हणजे एका कल्पनेच्या अनुषंगाने माणूस अनेक कल्पनांचे जाळे मिळत जातो. त्या कल्पनांची सांगड घालून दुःखी राहण्यातच सुख अनुभवत राहतो. लहानपणी अनेकानेक चित्र ,छोट्या छोट्या गोष्टी जमवण्याचा छंद प्रत्येकाला असतो .कोणी दगड,तर कोणी विविध वाद्यांच्या वस्तू, कोणी पेन जमवतो .त्याला लहानपणी खूप महत्त्व असतं आणि त्या आठवणी त्या वस्तूंभोवती असल्याने त्या फेकूनही देववत नाही. अर्थात लहानपणी त्याला जे महत्त्व होतं ते आत्ता अजिबातच नसतं. सध्याच्या भाषेत तो निव्वळ कचरा असतो. केवळ सुखद भावना त्याभोवती असतात एवढच. तसंच आठवणींचही आहे.

वर वर्णन केलेल्या अनेक गोष्टींचे आपल्याला विस्मरण होते म्हणूनच बरे आहे. तरीही अनुभव असा आहे की ,नेमक्या सुखद गोष्टी कमी आठवतात आणि दुःखद आठवणी दीर्घकाळ टिकून राहतात. आपल्या सासरच्या लोकांनी आपल्या आई-वडिलांना बाबत बोललेल्या काही नकारात्मक गोष्टी ऐकायलाही नको वाटतात, आपल्या अत्यंत दुःखद क्षणी कुणीतरी दाखवलेली अकारण सहानुभूतीही आपल्याला नकोशी वाटते आणि तो प्रसंग आजही आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. काही व्यक्तींना त्यांच्या प्रिय व्यक्तीने त्यांची केलेली प्रतारणा किंवा विश्वासघात आयुष्यभरासाठीची जखम बनून रहाते आणि प्रसंग प्रसंगाने त्यावरची खपली उडून जखम परत भरून वाहू लागते.. आपली सगळी कर्तव्य अतिशय चोखपणे केल्यानंतरही,कोणी केलेला अपमान किंवा अकारण वाईट बोलणे कायमचे जखमी करते.

आणि नकळत लहानपणी आपण जशा चॉकलेटचा कागद किंवा सिगरेटच्या कागदाच्या चांदीं जमा करायचो, पोस्टाचे तिकीट गोळा करायचो तसेच या आठवणी आपण कायमस्वरूपी गोळा करून ठेवतो अगदी त्याचे लक्तर, चिंध्या होईपर्यंत देखील ! कल्पनांच्या अनुषंगाने एक सूत्र मांडली जाते. तिला म्हणतात असोसिएशन ऑफ इमॅजिनेशन !म्हणजे एका कल्पनेच्या अनुषंगाने माणूस अनेक कल्पनांचे झाडे वाढवीत जातो .मग त्या कल्पनांशी तो खर्‍या-खोट्या दुःखाची सांगड घालुन दुःखी राहण्यातच सुख अनुभवत राहतो. गॉसिपिंग हाही त्यातलाच एक प्रकार ! कारण काहीएक मर्यादेपर्यंत शेअर करणे ठीक .परंतु सतत एखाद्या गोष्टीची तक्रार करत राहिल्याने ती गोष्ट नाहीशी तर होत नाहीच पण कोळसा उगाळावा तेवढा काळा असंच घडत जातं.

म्हणूनच मनाच्या चोर कप्प्यांमध्ये जमा करून ठेवलेले आठवणींचा चिंध्या, मात्र फेकायची आठवण होत नसली तरी फेकायला हव्यात! ज्याप्रमाणे चांगली भरजरी वस्त्र, पैठण्या आपण जपून ठेवतो त्याप्रमाणे सकारात्मक आठवणी जरूर जपून ठेवाव्यात. पण वारंवार ठिगळ लावून जपलेल्या दुःखांना कव टाळने बंद करायला हवे. नकारात्मकतेकडे नेणाऱ्या आठवणी उगाचच उगाळत का बसायचं ? त्याऐवजी त्यातून काही शिकता आलं तर शिकायचं ,लक्षात ठेवायचं! आणि त्यातून जे दुःख मिळालं ते विस्मरणाच्या शक्तीने मनातून दूर सारायचा.

आठवणीं कडून प्रेरणा घ्यायची ,ध्येय घ्यायचं, धडा शिकायचा, धोके लक्षात घ्यायचे आणि आत्मविश्वासाने पावले टाकायची .पण पुन्हा भ्रम आणि मोहात न सापडता, पुढची वाट अडखळून जाऊ नये म्हणून अधिक सकारात्मकरित्या ,परिपक्वतेने जे विसरायला हवं ते विस्मरणतच राहायलाच हवं. विसरता येणं हे एक क्षमता आहे. आणि तीच जीवन अधिक सकारात्मक ,आणि परिपक्व बनवते.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER