शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसाच्या सभेच्या आठवणी सोशल मीडियावर जाग्या

Sharad Pawar

सातारा : गतवर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे अनोखे रुप सातारकरांसह अख्ख्या महाराष्ट्राला पाहायाल मिळाले. १८ ऑक्टोबर २०१९ ला भर पावसात शरद पवारांनी घेतलेली सभा ही ऐतिहासिक सभा ठरली. आज याच सभेला वर्षपुर्ती झाली. यानिमित्त राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी त्यांच्या भरपावसातल्या सभेचा फोटो शेअर करत आठवणींना उजाळा देत आहेत.

सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले. वयाच्या ७९ व्या वर्षी भर पावासात केलेला प्रचार आणि त्यांचा उत्साह सातऱ्यासह महाराष्ट्रभर गाजला. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांनी त्यावेळी दाखवलेली जिद्द आणि जिगर पाहून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता.

पवारांच्या या ऐतिहासिक सभेला उजाळा देत राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर भाजपने केलेल्या वक्तव्याची आठवण करून देत खोचक चिमटे काढले आहेत. ‘त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, शरदपवार संपले. पण हा ८० वर्षाचा योद्धा सर्वांना पुरून उरला. अशी टिप्पणी केलेली सोशल मीडियात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्हायरल करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER